परभणी ः खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान एका पुरुषाचा गुरुवारी मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या १४१ झाली आहे. तसेच १४० बाधित रुग्ण आढळले. रुग्णसंख्या तीन हजार ७६५ झाली असून दोन हजार ७८९ रुग्ण बरे झाले आहेत.
रॅपिड टेस्ट केंद्रांच्या ढिसाळ नियोजनामुळे चाचण्यात मोठी घट
दिलेल्या वेळा न पाळणे, वाट्टेल तेव्हा केंद्र बंद करणे, आलेल्या नागरिकांना ताटकळत ठेवणे यासह असंख्य कारणामुळे नियोजित रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट केंद्रांचे नियोजन ढेपाळले असून, त्यामुळे रॅपिड टेस्टची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. महापालिकेने शहरातील व्यापारी, विक्रेते, नागरिकांच्या रॅपिड टेस्ट करण्यासाठी १६ केंद्रे उभारली होती; परंतु आता नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे ही संख्या सहावर आली आहे. प्रभागात जाऊन तपासण्या करण्यासाठी मोबाईल पथके तैनात करण्यात आली. मात्र नियोजन व नियंत्रणाच्या अभावामुळे प्रचंड अनियमितता निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्राच्या वेळा सकाळी नऊ ते दुपारी एक व दुपारी दोन ते सायंकाली पाच अशा असताना बहुतांश केंद्रे दुपारी बारापर्यंत सुरूच होत नाहीत. कधी डॉक्टर्स येत नाहीत, कधी तंत्रज्ञ, तर कधी किट नसतात. तोपर्यंत अनेक नागरिक कंटाळून निघून जातात. पाच-दहा नागरिक टेस्टसाठी आल्याशिवाय कीट चढवली जात नाही. दुपारी अनेक केंद्रे बंदच असतात. महानगरपालिकेने कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले हे आरोग्य कर्मचारी पूर्ण वेळ सेवा देत नसल्याचा परिणाम चाचण्यांवर होऊ लागला आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारा आरोग्य विभाग त्यापासून अलिप्तच असल्याचे दिसून येते. केंद्रावरील सुविधांबाबत देखील आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी ना खुर्च्या, ना सावली. कर्मचाऱ्यांसाठी साधे पाण्याची व्यवस्था देखील केली जात नाही.
पूर्णेत सात तर जिंतूरला चौदा पॉझिटिव्ह
पूर्णा ः पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याची ४५ वर्षीय पत्नी, तालुक्यातील वाई येथील अडीच वर्षांचा मुलगा, धानोरा काळे येथील ६० वर्षीय महिला, शहरातील आदर्श कॉलनी येथील ४६ वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी येथील ३६ वर्षीय पुरुष, आनंदनगर २० वर्षीय तरुण, न्यू आदर्श कॉलनीतील ६७ वर्षीय पुरुष असे एकूण सातजण रॅपिड अँटीजेन टेस्ट तपासणीत गुरुवारी (ता.दहा) कोरोनाबाधित आढळले. तर जिंतूर शहरासह ग्रामीण भागात चौदा पॉझिटिव्ह आढळले.
परभणीत १४ तर पालममध्ये आठ पॉझिटिव्ह
पूर्णा तालुक्यातील सहा जणांना येथील कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आल्याची माहिती कोविड केअर सेंटरचे प्रमुख डॉ.नागेश देशमुख व डॉ.विष्णू कानडकर यांनी दिली. जिंतूर शहरातील आमदार कॉलनीमधील ३४ व ३० वर्षीय पुरुष, हुतात्मा स्मारक परिसरात ५० वर्षीय महिला व दोनवर्षीय बालक, शिवाजीनगरात ५१ व ७० वर्षीय महिला तर ग्रामीण भागात खरदडी येथे ३० वर्षीय पुरुष तसेच बोरी येथेही सात पॉझिटिव्ह आढळले. येथे १४ जणांच्या तपासणीमधून ७५, ५०, २५ महिला तसेच ३२ वर्षीय महिला, ५८ वर्षीय पुरुष आणि एक वर्षीय बालक आढळून आले. महापालिकेच्या तपासणीत परभणीत १४ तर पालममध्ये आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
संपादन ः राजन मंगरुळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.